हुवाईचा हॉनर बी २ स्मार्टफोन भारतात दाखल


मुंबई : भारतात आज आपला हॉनर बी २ स्मार्टफोन हुवाई या लोकप्रिय ब्रॅंडने लॉंच केला असून केवळ ७४९९ एवढी या मोबाइलची किंमत आहे. भारतात २०१५मध्ये लॉंच झालेल्या हॉनर बी स्मार्टफोनच्या तुफान यशानंतर हा मोबाइल युजर्ससाठी आणला आहे. हा मोबाइल आजपासून ऑफलाईन पद्धतीने घेता येणार आहे. भारतात हुवाईच्या २०,००० पेक्षा जास्त पार्टनर स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. यासोबत १५ महिन्यांची वॉरंटी मिळणार आहे. गोल्ड, व्हाईट आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे.

हुवाईच्या या स्मार्टफोनमध्ये ४.५ इंचाचा डिस्प्ले, १ गीगा क्वार्ज कोअर प्रोसेसर मिळणार आहे. एंड्रोइड स्मार्टफोन ५.१ लॉलीलॉप आणि ऑपरेटींग सिस्टिम आणि २१०० mAh Li-Poly बॅटरी देण्यात आली आहे. या मोबाईलसोबत १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल स्टोरेज ही मेमरी ३२ जीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्डने वाढवता येऊ शकेल. याचा फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सलचा आहे तर बॅक कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. यामध्ये ड्युअल सिम, ४ जी वोल्ट, वायफाय, वायफाय हॉटस्पॉट, जीपीएस, मायक्रो युएसबी पोर्ट असणार आहे. द होनर बी 2 मध्ये रेनबो लाईट नावाचे स्पोर्ट्स फिचर असणार आहे. कॉल आल्यावर, कम्युनिकेशन, नोटीफिकेशनवेळी वायब्रंट कलर येऊन लाईट ब्लीक होईल.

Leave a Comment