नव्या अंदाजात गुगलचे ‘गुगल अर्थ’


आपल्या गुगल मॅप या फ्री सर्व्हिसचे रि-इमॅजिनेड व्हर्जन गुगलने लॉन्च केले असून युजर्सला त्यामुळे या मॅपच्या माध्यमातून आणखी क्लिअर आणि जवळचे चित्र बघायला मिळणार आहे. ही सेवा न्यूयॉर्क येथे पॄथ्वी दिवसाच्या निमित्ताने लॉन्च करण्यात आली आहे. हे जगाला आमचे गिफ्ट असल्याचे गुगल अर्थचे डिरेक्टर रेबेका मुरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

गुगल अर्थ ही एक आभासी दुनिया असून ज्याद्वारे युजर्स उपग्रहांद्वारे घेण्यात आलेले पॄथ्वीचे फोटो पाहू शकतात. हे फोटो १५ मीटर ते १५ सेंटीमीटर दरम्यानचे रिझॉल्य़ूशन वापरते. गुगल अर्थवर कोणत्याही परिसराला सर्च केले जाऊ शकते. आता नव्याने लॉन्च करण्यात आलेल्या सेवेनुसार युजर्सना त्यांच्या कम्प्युटर्स, स्मार्टफोन आणि टॅबलेटवरून याचा आणखीन जास्त चांगला अनुभव घेता येणार आहे.

लोकांना चित्रांसोबतच गुगल मॅपच्या या व्हर्जनमधून माहितीही दिली जाणार आहे. लोकांना त्यातून शिक्षित केले जाणार आहे. गुगल मॅपला आणखी जास्त अपडेट करून अधिक जास्त सूक्ष्म माहिती त्यातून दाखवली जाणार आहे. गुगलला जगाबद्दल सर्वकाही माहिती असल्यामुळे तुम्हाला या माध्यमातून जगाची माहिती मिळणार आहे.

https://www.google.com/earth/ या लिंकवर क्लिक करून करा जगाची सफर…!

Leave a Comment