एरोमोबिलची उडती कार २० एप्रिलला लॉच


स्लोव्हाकियाच्या ऑटो कंपनी एरोमोबिलने २० एप्रिल रोजी मोनॅको येथे होत असलेल्या मार्को शो मध्ये त्यांची कन्सेप्ट फ्लाईंग कार व्हर्जन सादर करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. यापूर्वी त्यांनी एरोमोबिल फ्लाईंग कार ३.० २०१७ मध्ये जगासमोर आणली होती सध्या ती प्रायोगिक स्वरूपातच आहे मात्र कार यशस्वी ठरली तर पुढच्या वर्षी तिची डिलिव्हरी दिली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

ही उडती कार वाहतूक कोंडीसाठी उत्तम पर्याय आहे. या इंटिग्रेटेड एअरक्राफ्ट कारला अन्य कारप्रमाणेच चार चाके आहेत. तसेच उडत्या कारची सारी फिचर्सही त्यात आहेत. रस्त्यावर चालताना ही कार लिटरला १२.५ किमीचे तर हवेत १५.० किमीचे मायलेज देईल. रस्त्यावर तिची रेंज ८७५ किमीची आहे तर हवेत हीच रेंज ७०० किमी असेल.

कंपनीने यापूर्वी सादर केलेल्या ३.० थ्री सीटर कारसाठी ४ सिलींडर रेाटेक्स ९१२ इंजिन दिले गेले होते. या कारचा जमीनीवरील टॉप स्पीड ताशी १६० किमी तर हवेतील टॉप स्पीड २०० किमी होता.

Leave a Comment