सेकंड हँड कार पण नव्या रोल्स रॉईसपेक्षाही महाग


चार कोटींपासून रेाल्स राईस या आलिशान शानदार कार्सच्या किंमती सुरू होतात व या कारची मालकी असणे हे मोठ्या अभिमानाचे मानले जाते. मात्र या शान की सवारीपेक्षाही महागडी कार बाजारात विक्रीसाठी आली असून ही कार सेकंड हँड आहे व तिची किंमत आहे ६ कोटी ५० लाख रूपये. ही कार १९६४ ची अॅस्टीन मार्टिन डीबी ५ ही आयकॉन कार आहे.

या कारला इतिहास आहे. ही कार प्रिस सदरूद्दिन आगाखान यांच्या मालकीची होती. या कारची हालत थोडी खराब झाली होती मात्र ती पूर्णपणे रिस्टोअर करण्यात आली होती. १९८६ पर्यंत आगाखान यांनी त्यांच्या वैयक्तीक वापरासाठी ती स्वित्झर्लंड येथून खरेदी केली होती. सध्या ही कार हायड्रोजन क्लासिक कंपनीच्या मालकीची असून त्यांनी ती २०१५ मध्ये खरेदी केली होती. याच कंपनीने या कारच्या विक्रीची जाहिरात दिली आहे. त्यात अपेक्षित किंमत ६.४७ कोटी रूपये असून या कारला ४ लिटर स्ट्रेट ६ सिलींडर इंजिन आहे. कारचे रिस्टोरेशन करताना ओरिजिनल कलर्समध्ये केले गेले आहे व इंटिरियरसाठी प्रिमियम क्वालिटी लेदरचा वापर केला गेला आहे.

Leave a Comment