मुकेश अंबांनींच्या यशाचे हेही रहस्य


रिलायन्स इंडस्ट्रीजचे धुरंधर मुकेश अंबानी यांच्या यशस्वी कारकीर्दीची अनेक कारणे सांगितली जातात त्यात आणखी एक अजब कारणही जोडले जात आहे. मुकेश अंबानी यांचा १९ एप्रिल हा जन्मदिवस आहे. अंकज्योतिषानुसार या अंकाची बेरीज १ येते व हा नंबर जन्मजात लिडर लोकांचा असतो. अंकज्योतिषी जुमानी यांच्या म्हणण्यानुसार भारतातीलच नव्हे तर जगातही अनेक टॉप लिडर्स १ नंबर आहेत. १,१०,१९,२८ या तारखेवर जन्मलेल्या सर्वांचा नंबर १ आहे.

या यशस्वी लोकांच्या यादीत मुकेश यांची पत्नी नीता जन्मतारीख १ नोव्हेंबर, रतन टाटा- २८ डिसेंबर, धीरूभाई अंबानी २८ डिसेंबर यांचा समावेश असून बिल गेटस यांची जन्मतारीखही २८च आहे. या नंबरवरच्या व्यक्ती जन्मजात लिडरशीप व मेनेजमेंटचे गुण घेऊनच येतात. त्यांचे व्यक्तीमत्त्व अतिशय स्ट्राँग असते व त्या नेहमीच सफल असतात. मुकेश यांचे शिक्षण पूर्ण झालेले नाही मात्र त्यांनी रिलायन्सचे साम्राज्य आणखी वाढविण्यात मोठेच यश मिळविले आहे. मुकेश जागतिक श्रीमंतांच्या यादीत ३३ नंबरवर असून ३०.७ अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेचे मालक आहेत.