लॅम्बोर्गिनीची नवी हुराकॉन पर्फोमेंट लाँच


नवी दिल्ली : भारतात नुकतीच प्रसिद्ध स्पोर्टस् कार निर्माता इतावली कंपनी लॅम्बोर्गिनीने आपली नवी हुराकॉन पर्फोमेंट लाँच केली असून या स्पोर्टस् कारला यापूर्वी फेब्रुवारीमध्ये जेनेवा मोटार शोमध्ये लाँच करण्यात आले होते. ३ करोड ९० लाख रुपये या स्पोर्टस् कारची किंमत असणार आहे.

या कारमध्ये ५.२ लिटरचे टाइटेनियम वॉल्व्ह देण्यात आला आहे. तसेच या कारमध्ये व्ही १० इंजिन देण्यात आले असून, ६३० बीएचपी आणि ६०० एनएमचा अधिकतम टार्क निर्माण करण्याची क्षमता असणार आहे. ही कार ० ते १०० किमी/प्रतितास तासांमध्ये २.९ सेकंदाच्या वेळेत पोहोचू शकणार आहे. या स्पोर्टस् कारचा टॉप स्पीड ३२५ किमी/प्रतितास असणार आहे. याचबरोबर ७ स्पीड डय़ुअल क्लच ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

Leave a Comment