स्नॅपचॅटच्या सीईओ विरोधात एकवटले ‘गरीब’ भारतवासी


मुंबई : भारताला गरीब म्हणून स्नॅपचॅटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इव्हान स्पिगेल यांनी संबोधले होते. भारतामध्ये हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर याचे तीव्र पडसाद उमटले असून हे अॅप जे लोक वापरत होते त्यांनी हे अॅप अनइंस्टॉल केले आहे तर ज्या लोक हे अॅप वापरत नव्हते त्यांनी सुद्धा स्नॅपचॅट हे अॅप आधी इंस्टॉल करुन त्यास डाऊनग्रेड करुन अनइंस्टॉल केल्यामुळे स्नॅपचॅटच्या मानांकनात घसरण झाली आहे. यावर सोशल मीडियातूनही तिखट प्रतिक्रीया येत असून इव्हान यांची खिल्ली उडविली जात आहे.

भारतात सध्या स्नॅपचॅटचे ४० लाखांपेक्षा युजर्स असून हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील युजर्सच्या भावना स्नॅपचॅट या वक्तव्याने दुखावल्या गेल्याने स्नॅपचॅटला विरोध होत आहे. सोशल मीडियावर इवान स्पीगल यांच्या या वक्तव्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे. #boycottsnapchat आणि #uninstallsnapchat या हॅशटॅगचा वापर करून युजर्स स्नॅपचॅटचा विरोध करत आहेत.

भारताला गरीब म्हटलेल्या स्नॅपचॅटच्या सिईओ इवान यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्व बाजुंनी टिका होत आहे. सोशल मीडियावरही जोरदार प्रतिक्रीया उमटत आहेत. त्यानंतर इवान यांनी आपण असे म्हणालोच नसल्याचा दावा केला आहे. अमेरिकन न्यूज वेबसाईट वरायटीने यासंबधीचे वृत्त दिले आहे.

Leave a Comment