एसबीआयची मिनिमम बॅलन्स ठेवण्याबाबतच्या नियमांमध्ये सूट


नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याबाबत दिलासा देण्यात आला असून एसबीआयमधील कॉर्पोरेट सॅलरी पॅकेज, लहान आणि बेसिक सेव्हिंग अकाऊंट आणि प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत खोलण्यात आलेल्या खातेधारकांना मिनिमम बॅलन्स ठेवण्याबाबतच्या नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे.

एसबीआयच्या खात्यांमधील मिनिमम बॅलन्सची मर्यादा १ एप्रिलपासून वाढवण्यात आली होती. ३१ कोटी खातेधारकांवर ज्याचा परिणाम झाला. शहरी भागात एसबीआयच्या खातेधारकांना ५००० रुपये ठेवणे अनिवार्य तर ग्रामीण भागात खातेधारकांना मिनिमम बॅलन्स २००० रुपये ठेवणे गरजेचे करण्यात आले होते. मात्र आता एसबीआयमधील कॉर्पोरेट सॅलरी पॅकेज, लहान आणि बेसिक सेव्हिंग अकाऊंट आणि प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत खोलण्यात आलेल्या खातेधारकांना खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही. एसबीआयने याबाबत ट्विट करुन ही माहिती दिली आहे.