स्नॅपचॅटच्या वादाचा फटका स्नॅपडीलला


मुंबई : भारतासारख्या गरीब देशांसाठी स्नॅपचॅट हे अ‍ॅप नसल्याचे वक्तव्य करुन स्नॅपचॅटचे मुख्य कार्यकारी अधिकारी इव्हान स्पिगेल चांगलेच अडचणीत सापडले. मात्र या प्रकरणाशी काहीही संबंध नसलेल्या ‘स्नॅपडील’ या अ‍ॅपला याचा फटका बसला.

#BoycottSnapchat ही मोहीम नेटिझन्सने सुरु केल्यामुळे अनेकांनी स्नॅपचॅट हे अॅप अनइन्स्टॉल केले. मात्र अनेकांनी चुकीने स्नॅपचॅट समजून स्नॅपडीलच मोबाईलमधून डिलीट केल्यामुळे या वादाचा स्नॅपडीललाही विनाकारण फटका बसला.

स्नॅपचॅटच्या सीईओंच्या वक्तव्याचा भारतीय नेटिझन्सनी जोरदार समाचार घेतला. त्यानंतर इव्हान स्पिगेल यांना आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरणही द्यावे लागले. मात्र तरीही भारतीय नेटिझन्सनी स्नॅपचॅट विरोधातील मोहीम सुरुच ठेवली आणि अॅप डिलीट करुन या अॅपचे प्ले स्टोअर्सवरील मानांकनही कमी केले.

अॅप स्टोअरनं दिलेल्या माहितीनुसार, स्नॅपचॅटच्या ग्राहक रेटिंगमध्ये घसरण झाली आहे. रविवारी सकाळी स्नॅपचॅटला दीड रेटिंग (९५२७ रेटिंग) मिळले आहे. पण इतरांच्या अॅपच्या स्पर्धेतही स्नॅपचॅटने चांगलीच मान टाकली आहे. सध्या स्नॅपचॅटला एक किंवा दीड (६०९९ रेटिंग) रेटिंग मिळत आहे.

गुगल प्ले स्टोअरवरील रेटिंग स्नॅपचॅट सीईओंच्या वक्तव्यानंतर घसरले आहे. स्नॅपचॅटचे माजी कर्मचारी अँथनी पॉम्पलियानो यांनी स्नॅपचॅटच्या सीईओंचे हे वक्तव्य उघडकीस आणले. त्यांनी २०१५मध्ये आपल्याला भारतासारख्या गरिब देशांसाठी आपले अॅप नसल्याचे पॉम्पलियानो यांना सांगितले होते.

दरम्यान, ट्विटरवरुनही स्नॅपचॅटविरोधात भारतीय नेटिझननी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटरवर स्नॅपचॅटला नेटिझननी ट्रोल करुन चांगलाच फटका दिला आहे. भारतीयांनी ट्विटरवर #boycottsnapchat ही मोहिम सुरु केली आहे. स्नॅपचॅटविरोधातील भारतीयांची ही मोहिम ट्विटरवर सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Leave a Comment