मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्याचा प्रयत्न एअरटेलने पुन्हा एकदा नवी ऑफर लाँच करत केला आहे. एअरटेल आपल्या पोस्टपेड यूजर्सना या नव्या ऑफरमध्ये पुढील तीन महिन्यांसाठी ३० जीबी फ्री डेटा देणार आहे.
३ महिन्यांसाठी ३० जीबी फ्री डेटा देणार एअरटेल
३० एप्रिलपर्यंत पोस्टपेड ग्राहकांना ही ऑफर मिळवण्यासाठी माय एअरटेल अॅपमध्ये लॉग इन करावे लागेल. यानंतर त्यांना पुढील तीन महिन्यांसाठी फ्री ३० जीबी डेटा मिळणार आहे. जिओला या नव्या ऑफरमुळे चांगलीच टक्कर मिळणार आहे. नव्या ऑफरविषयी बोलताना भारतीय एअरटेलचे सीईओ गोपाळ विठ्ठल म्हणाले, पुढील तीन महिन्यांसाठी फ्री डेटाची मजा घ्या. ही ऑफर लांबच्या सुट्टींसाठी चालू राहील.