ह्युंडाईची पहिली लक्झरी एसयूव्ही जीव्ही ८०


ह्युंडाईची पहिलीवहिली लग्झरी एसयूव्ही जीव्ही ८० जेनेसिस बाजारात येत असून ही हायड्रोजन फ्यूएल सेल पॉवरट्रेन फिचरसह बाजारात आणली जात आहे. ही कॉन्सेप्ट कार न्यूयॉर्कच्या इंटरनॅशनल ऑटो शेा मध्ये सादर केली गेली आहे. ह्युंडाईचा सिस्टर ब्रँड जेनेसिसची ही पहिलीच एसयूव्ही आहे.

या एसयूव्ही मध्ये अॅडव्हान्स तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे व त्यामुळे भविष्यात अनेक कार्समध्ये हे तंत्रज्ञान वापरले जाईल असे ह्युंडाईचे म्हणणे आहे. मिडीया रिपोर्टनुसार ही जीपच्या ग्रँड शेरोकी पेक्षा आकाराने मोठी व महागही असेल. या मॉडेलसाठी २२ इंची डिजिटल डिस्प्ले कर्व्ह डॅशबोर्ड दिला जात असून इन्स्ट्रूमेंट क्लस्टर सह ती येईल. मागे दोन सीट दिल्या जात आहेत व त्या दोन्हीसाठी स्वतंत्र इंफोटेनमेंट टचस्क्रीन दिले जात आहेत. ही कार इलेक्ट्रिक बॅटरी व हायड्रोजन फ्यूएल सेल अशा दोन्ही तंत्रज्ञानांचा वापर करून बनविली गेली आहे.

Leave a Comment