लग्झरी कोचसह धावली पहिली एक्स्प्रेस रेल्वे


भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी एकापेक्षा एक उत्तम सुविधा देऊ करत आहे. त्यात आता विस्टाडोम कोचची सुविधाही सुरू केली गेली असून आसपासच्या निसर्गसौंदर्याचा डब्यात बसूनच आनंद लुटता येईल अशा लग्झरी कोचसह पहिली एक्स्प्रेस रविवारी विशाखापट्टणम पासून किरांदूलकडे रवाना झाली. या ट्रेनला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हिरवा कंदिल दाखविला.

चेन्नईच्या कोच कारखान्यात हे विस्टाडोम कोच तयार केले गेले आहेत. मोठ मोठ्या काचांच्या खिडक्या, टपावरही काचांचे आवरण, ३६० अ्रशातून म्हणजे गोल फिरविता येणार्‍या ४० सीटस, लाऊंज अशी सुविधा या कोचना आहे. किरांदूल एक्स्प्रेसच्या या लग्झरी कोचमधून प्रवास करणारे प्रवासी १२८ किमीच्या अराकूदरी पर्वत रांगांतील नयनरम्य दृष्ये पाहताना हा प्रवास करू शकणार आहेत. दिव्यांगांसाठी साईड डोअरची सुविधाही येथे आहे. ऑटोमॅटिक दरवाजे, एलईडी दिवे, प्रवाशांना सूचना देण्यासाठी जीपीएस प्रणाली अशी त्याची अ्रन्य वैशिष्ठ्ये आहेत. लवकरच असे कोच अन्य रेल्वेसाठीही उपलब्ध केले जाणार असून पूर्वोत्तर गाड्यांसाठी ते प्रामुख्याने उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

Leave a Comment