अनेक लेन्सचे काम करणार चष्मा


वैज्ञानिकांनी आता स्मार्ट चष्मा विकसित केला असून त्यामुळे ज्यांना वेगवेगळ्या अंतरावरच्या वस्तू पाहण्यासाठी वेगवेगळ्या लेन्सचा वापर करावा लागतो, त्यांना एकाच लेन्समध्ये हे काम करता येणार आहे. युटा युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी ही लेन्स अशा प्रकारे विकसित केली आहे. की ती डोळ्याच्या बाहुलीप्रमाणे काम करू शकते. म्हणजेच ही लेन्स कोणत्याही अंतरावरच्या वस्तूवर फोकस करू शकते.

यासाठी यात ग्लिसरीनचा वापर केला गेला असून त्याभोवती लवचिक कव्हर दिले गेले आहे. वय वाढते, तसा डोळ्याचा लवचिकपणा व बुबुळ व बाहुलीची लवचिकता कमी होते व ते ताठर बनतात. यामुळे दूरच्या अथवा जवळच्या वस्तू पाहण्यासाठी चष्मा वापरावा लागतो. वेगवेगळ्या अंतरावरच्या वस्तू पाहण्यासाठी वेगवेगळी लेन्स वापरून असे चष्मे तयार केले जातात. स्मार्ट चष्मा लवचिक लेन्सभोवती फ्रेम करून बनविला जातो. ही लेन्स हवी तशी वळतात, वाकतात व त्यामुळे एकाच वेळी अनेक लेन्सचे काम ती करू शकतात. ऑप्टिक जर्नलमध्ये हे संशोधक प्रकाशित केले गेले आहे.

Leave a Comment