सिगरेट कंपनीमुळे आयुर्विमा महामंडळ मालामाल


सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात बडी विमा कंपनी आयुर्विमा महामंडळ इंडियन टॉबॅको कंपनी म्हणजेच आयटीसीमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून मालामाल झाली आहे. योगक्षेमं वहाम्यहम अशी विमाधारकांच्या जीवनाची कंाळजी घेणारी एलआयसी धुम्रपान आरोग्यास हानीकारक आहे अशी सूचना द्यावी लागणार्याघ सिगरेट कंपनीमुळे श्रीमंत बनल्याने तो मोठाच चर्चेच विषय बनला आहे.

तंबाखू व तंबाखू उत्पादनांच्या सेवनामुळे आरोग्यास हानी पोहोचते या कारणाने अनेक कंपन्यांनी सिगरेट कंपन्यांमधील गुंतवणूक काढून घेतल्याचा फायदा एलआयसीला झाला आहे. जागतिक स्तरावर अनेक गुंतवणूक कंपन्या, म्युच्यूअ्रल फंड कंपन्या तंबाखू उत्पादन कंपन्यांत गुंतवणूक करण्यापासून दूर राहिल्या आहेत. मात्र एलआयसीचा आयटीसी मधील हिस्सा १६.३ टक्क्यांवर आहे. पहिल्या तिमाहीत त्यात २ टक्के वाढ झाली आहे. एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्य ५५ हजार कोटींवर गेले आहे. शिवाय सार्वजनिक क्षेत्रातील अन्य विमा कंपन्या ओरिएंटल इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स कार्परेशन यांचीही यातील भागी १७ हजार कोटींवर गेली आहे. मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात जनहित याचिका दाखल केली गेली असून त्यात सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांनी तंबाखू उद्योगात गुंतवणूक करणे हे सरकारी धोरणाच्या विरोधात असल्याचा आरोप केला गेला आहे.

Leave a Comment