नासाने केला शनीच्या चंद्रावर सजीवसृष्टी असल्याचा दावा


वॉशिंग्टन – कॅसिनी मिशननंतर ‘नासा’च्या शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधानुसार, रासायनिक उर्जा शनीचा उपग्रह असलेला बर्फाच्छादित चंद्र ‘एन्सेलाडस’वर असल्यामुळे तेथे जीवन अस्तित्वात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या माहितीचा खुलासा नासाच्या शास्त्रज्ञांनी केला आहे.

रासायनिक उर्जेचे अस्तित्व एन्सेलाडसवरील छोट्या छोट्या महासागरांमध्ये आढळणे, हे त्या भागात जैविक अस्तित्व असण्याच्या शक्यतेची पुष्टी करते. पृथ्वीच्या बाहेरील जीव अस्तित्वाच्या शोधामधील, हा अत्यंत महत्वाचा पैलू असल्याचे स्पष्टीकरण मिशन कॅसिनी प्रोजेक्टच्या प्रमुख लिंडा स्पिलकर यांनी दिले.

नासाचे थॉमस झ्युरबुचेन याविषयी बोलताना म्हणाले, नुकत्याच लागलेल्या या शोधामुळे, पृथ्वी वगळता इतर कुठे जैविक अस्तित्व आहे का, या प्रश्नाच्या उत्तराच्या आम्ही अधिक जवळ पोहचलो आहोत. कॅसिनी मिशनच्या शोधाविषयी शोधकर्त्यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, एन्सेल्डसवर हाईड्रोजन गॅसचे अस्तित्व आढळले आहे. हायड्रोजन गॅस हा एकाप्रकारे ‘जीवांसाठी’ लागणारा रासयनिक उर्जेचा स्त्रोत निर्माण करु शकतो.

थोडक्यात, शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार खरोखरच तिथे कोणता जीव अस्तित्वात असेल, तर तो जीव समुद्राच्या पाण्यामध्ये असेलला कार्बनडाय ऑक्साईड आणि तिथला हायड्रोजन गॅस एकत्रित करुन त्याचा वापर उर्जा निर्माण करण्यासाठी करु शकतो. ही रासायनिक प्रक्रिया मेथॅनोजेनेसिस या नावाने ओळखली जाते. या प्रक्रियेतून मिथेन वायू उत्सर्जित होतो. ज्याच्या उपयोग आपल्या ग्रहावर जैविक उत्त्पत्तीसाठी होऊ शकतो.

Leave a Comment