द. आशियाई उपग्रह सेवेतून पाकिस्तानला वगळले


येत्या पाच मे रोजी इस्त्रोकडून श्रीहरिकोटा येथील अंतराळ स्थानकावरून प्रक्षेपित करण्यात येणार्‍या दक्षिण आशियाई उपग्रह कार्यक्रमातून पाकिस्तानला वगळले गेले असल्याचे इस्त्रोचे अध्यक्ष एएस किरणकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले या कार्यक्रमात सामील होण्याची पाकिस्तानची इच्छा नव्हती त्यामुळे त्यांना वगळले गेले आह. या संचार उपग्रहाचा उपयोग पाकिस्तान सोडून सर्व दक्षिण आशियाई देशांना होणार आहे. हा संचार उपग्रह जी सॅट ९, जीएसएलव्ही ०९ रॉकेटच्या सहाय्याने अंतराळात सोडला जात आहे.

हा उपग्रह १२ केव्ही बँड ट्रान्सपाँडर अंतराळात घेऊन जाईल. याचे डिझाईन असे बनविले गेले आहे की तो १२ वर्षे तरी कार्यरत राहील. पंतप्रधान मोदी जेव्हा २०१४ मध्ये नेपाळला काठमांडू येथे दक्षेस शिखर परिषदेसाठी गेले होते, तेव्हा त्यांनी द.आशियाई देशांसाठी उपग्रह सोडला जाईल अशी घोषणा केली होती. हा उपग्रह म्हणजे भारताच्या शेजारी देशांना भारतातर्फे भेट असेल असेही ते म्हणाले होते. ती घोषणा आता प्रत्यक्षात आणली जात आहे.

Leave a Comment