अंटार्टिकातील ब्लड फॉल


अंटार्टिकातील टेलर ग्लेशियरच्या वेस्ट लेक बोनी मधून निघणार्‍या एका धबधब्याचे पाणी रक्तासारखे लाल आहे व त्यामुळेच त्याला ब्लड फॉल असे म्हटले जाते. अंटाटिकाच्या शुभ्र बर्फाच्छादित प्रदेशातून वाहणारा व पाच मजली इमारतीच्या उंचीचा हा धबधबा जगातील एक आश्चर्य मानले जात असले तरी येथे पर्यटकांची फारशी गर्दी होत नाही. यामागचे मुख्य कारण म्हणजे या धबधब्यात आत्म्यांचा निवास आहे व येथे भेट देणार्‍या पर्यटकांना ते ठार करतात व म्हणूनच येथील पाण्याचा रंग रक्तासारखा लाल आहे अशी धारणा आहे.

या ग्लेशियरचा शोध १९११ मध्यें अमेरिकन जैववैज्ञानिक ग्रिफिथ टेलर याने लावला. या ब्लड फॉलमध्ये १७ प्रकारचे सूक्ष्म जीव असल्याचेही त्याने शोधले तसेच या धबधब्याखालचे सरोवर गोठलेले असते व त्याला भेगा पडलेल्या असल्याने तेथे पाणी हळू वाहते. या पाण्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या आयर्न कणांचा हवेशी संपर्क येतो व त्यामुळे लाल रंगाचे आयर्न ऑक्साईड बनते व त्याचा परिणाम म्हणून हे पाणी लाल रंगाचे दिसते असेही त्याने सिद्ध केले आहे.

Leave a Comment