महाराणी एलिझाबेथच्या हँडबँगेचे रहंस्य


ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ दोन या जेव्हा केव्हा सार्वजनिक कार्यक्रमात दर्शन देतात तेव्हा त्यांच्या हातात हँडबॅग असते. जणू हँडबॅग हा त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचाच एक भाग आहे. अर्थात राणी ही हँडबॅग केवळ स्टाईल म्हणून वापरत नाही तर तिच्या कामाच्या वैयक्तीक वस्तू त्यात असतात त्याचबरोबर राणी या हँडबॅगचा वापर करून आपल्या पर्सनल स्टाफला गुप्त संदेश देत असते असा दावा रॉयल बायोग्राफर शॅली बेजेल स्मिथ हिेने २०१२ साली लिहिलेल्या एलिझाबेथ द क्वीन, द वुमन बिहाईंड द थ्रोन या पुस्तकात केला आहे.

शॅलीच्या म्हणण्यानुसार राणी तिच्या हँडबॅगमध्ये चष्मा, लिपस्टीक, आरसा, पेन, मिंट गोळ्या अशा वस्तू ठेवते. कॅश सहसा ठेवत नाही. अगदीच रविवारी चर्च मध्ये जाताना पाच,दहा पौंडांच्या नोटाही ठेवते. तसेच नातवंडांनी दिलेले काही लकी चार्मस ही असतात. राणी या हँडबॅगेच्या माध्यमातून तिच्या पर्सनल स्टाफला गुप्त संदेश देते. म्हणजे राणीने एका हातातून दुसर्‍या हातात पर्स घेतली की समजायचे चालू असलेली चर्चा ती लवकरच संपवित आहे. डिनर टेबलवर पर्स ठेवली तर पाच मिनिटात हा कार्यक्रम ती संपविणार आहे.

राणीने पर्स जमिनीवर ठेवली तर सुरू असलेल्या कार्यक्रमाला ती कंटाळली आहे. मग तिचा स्टाफ कांही तरी कारण काढून तिला तेथून दूर नेतो. राणीच्या संग्रहात २०० हँडबॅग आहेत. या हँडबॅगचे हँडल नेहमीपेक्षा थोडे अधिक लांबीचे असते कारण यामुळे राणीला हस्तांदोलन करताना अडचण येत नाही. राणीच्या हँडबॅग मध्ये मोबाईलही असतो असेही शॅलीचे म्हणणे आहे.

Leave a Comment