डिजीटल व्यवहारात लातूरच्या मुलीने जिंकले कोटीचे बक्षीस!


नागपूर: आज डिजीधन योजनेअंतर्गत डिजीटल व्यवहार करणाऱ्या भाग्यवान विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. १ कोटी रुपयांच्या बक्षीसाची भाग्यवान विजेती लातूरची श्रद्धा मेंगशेट्टे ही तरुणी ठरली. केवळ १४९० रुपयांचा डिजीटल व्यवहार श्रद्धाने केला होता. ती डिजीधन योजनेअंतर्गत भाग्यवान ठरली. तर चिमन भाई प्रजापती (गुजरात) यांना ५० लाखाचे दुसरे आणि केवळ शंभर रुपयांचे डिजीटल पेमेंट करणारे भरत सिंह (देहरादून) यांना २५ लाख रुपयांचे तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे.

१) श्रद्धा मेंगशेट्टी (लातूर) १५०० रु. डिजीटल पेमेंट करून १ कोटीचे बक्षीस
२) चिमन भाई प्रजापती (गुजरात) ५० लाखांचे बक्षीस
३) भरत सिंह (देहरादून) १०० रु चे पेमेंट करून २५ लाख बक्षीस

सरकारने नोटाबंदीनंतर देशात डिजीटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजना सुरु केल्या होत्या. १० एप्रिलला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात या बंपर बक्षीसांची सोडत काढण्यात आली. मात्र त्यावेळी विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली नव्हती.

दरम्यान, डिजीधन योजनेअंतर्गत व्यापाऱ्यांसाठीही विविध बक्षीस मिळाली. यामध्ये चेन्नईच्या जी आर राधाकृष्णन यांना ५० लाखाचे पहिले, ठाण्याच्या रागिनी उत्तेकर यांना २५ लाखाचे दुसरे आणि हैदराबादच्या शेख रफी यांना १२ लाखाचे तिसरे बक्षीस मिळाले.

काही दिवसांपूर्वी हफ्त्यांवर एक मोबाईल मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणाऱ्या लातूरच्या श्रद्धाने खरेदी केला होता. त्याच मोबाईलचा हफ्ता श्रद्धाने डिजीटलरित्या भरला होता. याच व्यवहारासाठी तिला १ कोटींचे बक्षीस मिळाले. लातूरमध्ये राहणाऱ्या श्रद्धा मेंगशेट्टेचे वडील किराणा दुकान चालवतात. मात्र, अवघ्या १४९० रुपयांच्या व्यवहाराने आता ती करोडपती झाली आहे. या योजनेत १ हजाराचीही अनेक बक्षीसे आहेत. मात्र आज नागपुरात प्रामुख्याने बंपर ड्रॉ चे विजेते असणाऱ्या६6 प्रमुख भाग्यवतांना बक्षीस दिले गेले.