इतर कंपन्यांच्या विरोधात जिओची ट्रायमध्ये तक्रार


मुंबई: टेलिकॉम इंडस्ट्रीतील इतर कंपन्यांना रिलायन्स जिओच्या धमाकेदार ऑफरमुळे चांगलाच फटका बसल्यामुळे जिओच्या विरोधात इतर टेलिकॉम कंपन्या ट्रायमध्ये अनेकदा गेले. त्यासोबतच या कंपन्यांनी जिओला टक्कर देण्यासाठी आणि आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन ऑफर्स आणल्या. आता याच इतर कंपन्यांच्या ऑफर्स विरोधात जिओने ट्रायमध्ये धाव घेतली आहे.

१० एप्रिलला ट्रायला जिओने पत्र लिहिले आहे. त्यात जिओचे म्हणणे आहे की, ग्राहकांशी ज्याप्रकारे या कंपन्या वागत आहेत ते लायसन्सच्या नियमांचे उल्लंघन आहे. नेटवर्क सोडून जाणाऱ्या ग्राहकांना थांबवण्यासाठी विशेष पॅकेज आणि प्लान यासारखे अनेक मार्ग वापरण्यात येत आहेत.

टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना रोखण्यासाठी चुकीच्या पद्धती वापरत असल्याचा, असा आरोप रिलायन्स जिओने केला आहे. या कंपन्यांचे नेटवर्क मोठ्या प्रमाणात ग्राहकांना नको आहे. पण या कंपन्या ग्राहकांना तसे करु देत नसल्याचे जिओचे मत आहे.

Leave a Comment