गुड फ्रायडे अर्थात उत्तम शुक्रवार : येशू ख्रिस्ताचे मरण


येशू ख्रिस्ताचे मरण स्वाभाविक तसेच अस्वाभाविक आणि अद्भूत होते.

येशू स्वत: म्हणतो, “For I have come down from heaven not to do my own will, but the will of him who send Me.”

मी स्वत:च्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे.’ यावरून येशूला स्वर्गीय देवपित्याने पाठविले हे स्पष्ट होते. स्वर्गी देवपित्याची इच्छा काय आहे? “For this is the will of My Father, that everyone who ejolds the Sun and believes in Him will have eternal life, and I myself will raise him on the last day.”

माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला (येशूला) पाहून त्याच्यावर विश्‍वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, त्याला मीच शेवटच्या दिवशी उठविन. योहा. 6:38,40 (बायबल) लोकांचे तारण व्हावे म्हणून येशूला बालक रूपाने या भूतलावर पाठविले. तो साडेतेहतीस वर्षे या जगात राहिला.

ज्याचे मरण खरे होते. ज्यांनी त्याला पकडले, दुष्ट दुर्जनांनी स्वत:च्या हातांनी त्याला वधस्तंभावर खिळून मारले-वध केला. तो दुसरा तिसरा कोणी नसून जीवंत परमेश्‍वर पित्याचा एकूलता एक पूत्र इम्मानूएल होता. त्याचे रक्त पवित्र व दैवी होते. त्याने देवाची मंडळी आपल्या रक्ताने विकत घेतली. प्रे.कृ. 20:28 (बायबल) देवपित्याबरोबर, (येशू) स्वत:बरोबर जगाचा समेट घडवून आणत होता. तो देव-देहधारी झाला. (योहा. 1:1 (बायबल)..and the word was with God, and the Ward was God.

त्याने (येशूने) शेवटपर्यंत आज्ञापालन केले व स्वत:ला लीन केले. फिली. 2:8 (बायबल) He humbled Himself by becoming obdient to the point of death even a cross.

मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होवून त्याने मरण आणि तेहि वधस्तंभावरचे मरण सोसले, येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वत:ला लीन केले. त्याच्या मुखात कपट आढळले नाही. त्याला पाप ठाऊक नव्हते. पेत्र 2:22 (बायबल) Who Committed no sin, Nor was any deceit found in his Mouth.

जगाच्या स्थापनेपासून वधलेला कोकरा तोच होता. प्रकटी. 13:8 He was the one chosen as th elamb that was to be killed.

तारणाची ही योजना होती. आम्ही पाप्यांनी जीवंत रहावे म्हणून त्याने स्वत: मरण सोसले. पापांबद्दलची किंमत भरून देणारा दुसरा पात्र, चांगला असा कोणी नव्हता. येशू म्हणाला,”For this reason the Father loves me, because I lay down My life so that I may take it again.

योहा. 10:17ए 18 (बायबल) मला स्वत:चा प्राण देण्याचा आणि परत घेण्याचा अधिकार आहे.

प्राण देत असताना त्याचे सात वाक्य हे त्याचे दैवत्त्व दाखविणारे सातपट प्रमाण आहेत. त्याने स्वत:ला पापी लोकांच्या स्वाधीन केले. He surrended himself to them and as a lamb led to be shouthered they took him away. The death of Jesus was uncomparable.

त्याच्या या उद्गारातून यातना सहन करणार्‍याचे उत्तम गुण प्रकट होतात. त्यात सुवार्ता आहे, विजय आहे आणि मरणाची पूर्णता आहे. त्याचा पहिला उद्गार – क्षमेचा उद्गार! Jesus said, “Forgive them, Father, they don’t know what they are doing.

त्यांनी त्याला ‘गुलगुथा’ या ठिकाणी नेले. जिथे ताणार्‍याचे कृपाळू अंत:करण आणि मानवाचे बंडखोर मने यांचा परस्पर विरोध जाणवतो. (शांतवृत्ती विरूद्ध द्वेष, मत्सर, राग) या ठिकाणी देवपूत्राद्वारे आपले सर्वोत्कृष्ट कामगिरी पार पाडली. मनुष्याची हीन वृत्ती दिसते तर प्रीतीने विश्‍वासाचा न्याय मिळावा.

1. क्षमेचा उद्गार : येशू वधस्तंभावर खिळलेला आहे आणि तो वेदना सहन करीत आहे. अशाही परिस्थितीत तो मानवाच्या पापी अंत:करणाचा विचार करतो. पाप आहे तेथे पवित्रता नाही. परमेश्‍वर पवित्र देव आहे. पापांची क्षमा झाल्याशिवाय सार्वकालिक जीवन नाही. येशू वधस्तंभावरून मानवाच्या पापक्षमेसाठी देवपित्याला मध्यस्थीची प्रार्थना करतो. “Jesus said, “Forgive them, Father They don’t know what they are doing.” हे बाप्पा, त्यांना क्षमा कर कारण ते काय करत आहेत ते त्यास समजत नाही. लूक : 23:34 (बायबल) या शब्दात शांतपणा आहे. सर्वांनी पाप केले आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहे. देपित्यासंगती असायला पाहिजे तर या क्षमेत माझा सहभाग हवा. आजच पापांबद्दल क्षमा मागू आणि आपले जीवन पवित्र करू या. क्षमेपुढे बाकीच्या देणग्या व कृपादाने फिक्कीच आहेत.’

2. दुसरा उद्गार : वधस्तंभावर दु:ख भोगीत असताना येशू त्याच्या बरोबर असलेल्या चोराला म्हणाला,”Truly I say to you, today you shall be with Me in Paradise.” मी तुला खचित सांगतो, तु आज मतबरेाबर सुखलोकांत असशील. ‘लूक 23:43 (बायबल) मरणानंतर मानवाचे आत्मे एक तर स्वर्गात किंवा नरकात जातात. आत्म्याला मरण नाही. येशू स्वर्गाचे दार आहे. त्याच्यवर विश्‍वास ठेवल्याने स्वर्गात प्रवेश होतो. चोराची विनवणी येशूने ऐकली त्याला येशूने उत्तर दिले. खरा विश्‍वास, खरा पश्‍चाताप खरे परिवर्तन हवे आहे. आमच्या पापांच्या बदली मिळणारी शिक्षा येशूने वधस्तंभावर सोशिली.

3. ममतेचा उद्गार : येशू आपल्या आईची काळजी घेतो. तेा शिष्याला म्हणतो, ‘पाहा ही तुझी आई! आणि आईला म्हणतो, ‘ बाई पाहा हा तुझा मुलगा! “Then He said to the disciple, Behold your Mother!” He said to His Mother, “Woman, behold your son!” प्रत्येक लेकरांनी आई-वडिलांची काळजी घ्यावी, त्यांचा सांभाळ करावा ही येशूची शिकवण त्याने स्वत:च्या आचारणात आणी. आम्ही तसे करावे.

4. दु:खाचा उद्गार : येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला ‘एलोई एलोई, लमा सबक्तनी’ म्हणजे ‘माझ्या देवा, माझ्या देवा, तु माझा त्याग का केलास ?’ Jesus cried out wwith a loud voice, “ELOI ELOI, Lama Sabchthani?” which is translated My God, My God why have you forsaken Me? मार्क 15:34 (बायबल) ही येशूची अरॅमिक भाषा आहे. पाप लादलेला येशू आता अतुच्य टोक गाठलेल्या दु:खामध्ये आहे. आम्हा सर्वांचे पाप येशूवर लादले, असे संदेष्टा यशाया 53व्या अध्यायात लिहितो. यावेळी देवपित्याने त्याच्यापासून तोंड फिरवले आणि हेच दु:ख येशूला झाले. पित्याचा विरह, आम्ही पापातच राहिलो. तर देवपिता परमेश्‍वर याचा विरह सहन करावा लागेल. अशा लोकांचे आत्मे नरकात फेकले जातील. सार्वकालिक दु:ख भोगण्यासाठी.

5. क्लेशाचा उद्गार : तहान लागले ही फार मोठी समस्या आहे! ‘त्यानंतर सर्व पूर्ण झाले आहे, हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ‘मला तहान लागली आहे’ असे म्हटले. “I am thirrty” योहान 19:28. येशूने आपले मस्तक लववून आत्मा समर्पण केला. त्या अगोदर हा उद्गार काढला. Now he needs water. जग, पाणी ज्याने निर्माण केले, जो म्हणाला मी जीवनाचे पाणी आहे. तोच आता म्हणतो, ‘मला तहान लागली आहे.’ माझ्या आत्म्याची, आत्मिक फळांची येशूला तहान लागलेली आहे. ती आम्ही कधी शमवणार? ज्या कार्यासाठी देवाने त्याला पाठविले, ते त्याने पूर्ण केले. शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून तो म्हणाला. तारणाच्या प्रक्रियेत शरीराचा सुद्धा समावेश आहे. क्षणात, निमिषात आपण बदलून जाऊ.

6. विजयाचा उद्गार : येशूने आंब घेतल्यावर ‘पूर्ण झाले आहे.’ असे म्हटले. Then Jesus had taken the Vinegar. He said “It is finished!” (योहा. 19:30 बायबल), कार्याच्या पूर्णतेची ग्वाही! कार्य सिद्धीस नेल्याने सुटकेचा, समाधानाचा, विजयाचा शब्द! येशूने समेटाची कामगिरी पूर्ण केली. देवाचा पवित्र हेतू पूर्ण केला. मानवाच्या तारणाची योजना देवाच्या ईच्छेप्रमाणे पूर्णतेस नेली. बलिदान पुर्ण केले. विजयाची घोषणा! ख्रिस्ताने पूर्ण केलेल्या कार्याचा परिणाम पूर्णपणे समजावून घेण्यासाठी पश्‍चातापाची आणि विश्‍वासाची गरज आहे. अखिल मानवाच्या पापाबद्दलची मधस्थी येशूने केली. वचनांचा व सांगणार्‍यांचा दुष्काळ पडणार आहे. वेळीस साव व्हा. आमोस 8:11:2 (बायबल)

7. समाधानाचा उद्गार : तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, ‘ हे बाप्पा, मी आपला आत्माा तुझ्या हाती सोपवून देतो.’ “Father, into your hands I place my spirit” असे बोलून त्याने प्राण सोडला. (लूक 23:24 बायबल) आत्मा पित्याच्या हाती दिला. आत्मा फारच मोलवान आहे. ही ठेव आहे. आत्मा कोठे जातो याकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. आत्म्याचा नाश होऊ नये याकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. आत्म्याचा नाश होऊ नये यासाठी आपल्या वर्तुणुकीकडे लक्ष द्यावे. मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ?

येशू अनाथ नव्हता. त्याला पिता आहे आणि देवाला प्रिय आहे. तो शेवटी पित्याच्या विसाव्याच्या स्थळी आणतो. बाप्पाचे घर किती छान आहे. सुरक्षित स्थान! परमेश्‍वराच्या हाती आपण आहोत तर भीति नाही. तुम्ही देवाच्या शक्तीने रक्षिलेले आहात. (पेत्र 1:5 बायबल) अंत:करणाचे रक्षण कर. (नीति. 4:23) आमच्या रक्षणासाठी प्रार्थना करू या. ‘देवपित्याची प्रीति, तारणाला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा व शांती आणि पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन व सहवास सर्वांबरोबर असो. आमेन.

– रा. रेव्ह. आर.एस. दळवी, मो. 9763728162