नवी दिल्ली : कोणताही आर्थिक व्यवहार करताना आता कॅश, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड सोबत बाळगण्याची गरज नाही. आपण आपल्या बोटांनी सहज पेमेंट करु शकणार आहोत. पण त्यासाठी आपला आधार कार्ड नंबर बँक खात्याशी जोडला असला पाहिजे. बँक खात्याशी आपला आधार नंबर जोडला असेल तर आधार-पेच्या मदतीने आपण पेमेंट करु शकतो.
तुम्ही आता करू शकणार तुमच्या बोटांनी पेमेंट
पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे निमित्त साधून आधार-पेची सुरूवात करणार आहेत. आधार-पेची सुरूवात करण्याआधी भोपाळ आणि दिल्लीमध्ये याविषयी चाचणी घेण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच छोटे-मोठे सर्वच आर्थिक व्यवहार आपण आधार-पेच्या आधारे करू शकणार आहोत. या योजनेतून जनतेची कोणतीही फसवणूक होणार नाही, कारण प्रत्येकवेळी पेमेंट करताना फिंगर प्रिंट घेण्यात येतील असा दावा सरकारने या योजनेमागे केला आहे.