व्होडाफोन देणार ४जीबी फ्री डेटा


मुंबई – स्वस्तात इंटरनेट प्लॅन्स रिलायन्स जिओने उपलब्ध केल्यानंतर सर्वच टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणल्यानंतर मग प्रत्येक कंपनीनेच ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली. मंगळवारी ‘धन धना धन’ ऑफर रिलायन्स जिओने बाजारात लाँन्च केल्यानंतर आता व्होडाफोनने आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर उपलब्ध करुन दिली आहे. या ऑफरमध्ये व्होडाफोनच्या ग्राहकांना तब्बल ४जीबी इंटरनेट डेटा मोफत देणार आहे.

आपल्या यूजर्सला प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी व्होडाफोन ४जीबी इंटरनेट डेटा मोफत देणार आहे. यूजर्सने जर आपले सिमकार्ड व्होडाफोन ४जी सुपरनेट सिममध्ये अपग्रेड केल असेल तरच कंपनीकडून त्याला ४जीबी डेटा मोफत मिळणार आहे. मुंबईतील यूजर्ससाठी ही खास ऑफर उपलब्ध आहे. व्होडाफोन ४जी सिम यूजर्सला व्होडाफोन स्टोअर्स आणि व्होडाफोन मिनी स्टोअर्सवर मिळेल. त्यामुळे यूजर्स सिम कार्ड अपग्रेड करुन ४जीबी डेटा मोफत मिळवू शकतात.

व्होडाफोनचे प्रिपेड यूजर्स जे सुपरनेट ४जी सिमकार्डमध्ये स्विच करतील त्यांना १० दिवसांसाठी ४जीबी फ्री इंटरनेट डेटा मिळणार आहे. तर पोस्टपेड यूजर्स ४जीबी फ्री डेटाचा वापर आपल्या पुढल्या बिल सर्कल पर्यंत वापरु शकणार आहेत. व्होडाफोनने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ४जी सिमकार्ड अपग्रेड झाल्यानंतर फ्री डेटा ग्राहकांच्या डेटा बँलंसमध्ये जोडला जाईल.

Leave a Comment