सर्वसामान्यांना परवडेल अशी होंडाची नवीन सीडी ११० ड्रिम बाईक


नवी दिल्ली: होंडा या प्रसिद्ध बाईक उत्पादक कंपनीने बीएस-3 ह्या बाईकवर बंदी घालण्यात आल्यानंतर आता नवीन ड्रिम डिएक्सला बीएस-४ ने अपडेट करत सीडी ११० ड्रीम डिएक्स नावाने लॉन्च केली असून सर्वसामान्यांना परवडणा-या या किक स्टार्ट मॉडेलची शोरूम किंमत ४५००० रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर सेल्फ स्टार्ट मॉडेलची किंमत ४७,२०२ रूपये ऐवढी ठेवण्यात आली आहे. सर्वात स्वस्त बाईकमध्ये बीएस-४ अपग्रेडेशनसोबतच ऑटो हेडलॅंप्स ऑन फिचर कंपनीने दिले आहेत.

टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि ट्विन हायड्रॉलिक शॉक्स नवीन होंडा सीडी ११० ड्रिम डिएक्समध्ये दिले गेले आहेत. यासोबत बाईकमध्ये मेंटनन्स फ्री बॅटरी, इलेक्ट्रिक स्टार्ट, ट्यूबलेस टायर्स सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. १०९ किलो वजनाच्या या बाईकमध्ये इंधन टॅंकची क्षमता ८ लीटर ऐवढी देण्यात आली आहे. ही नवीन दमदार बाईक चार वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. यात ब्लॅक व ग्रे, ब्लॅक व रेड, ब्लॅक व ग्रीन आणि ब्लॅक व ब्ल्यू ग्रॅफिक्स रंगांचा समावेश आहे.

Leave a Comment