इन्स्टाग्रामवर देखील मोदींचाच बोलबाला


नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागे टाकले असून मोदींनी इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या नेत्यांमध्ये अव्वल स्थान गाठले आहे. ६९ लाख जण मोदींना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.

जगभरातील राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्रुसन मास्टेलर या आंतरराष्ट्रीय कंपनीने लक्ष ठेवले होते. अशा ३२५ नेत्यांच्या अकाऊंटचा वर्षभर अभ्यास केल्यानंतर कंपनीने अहवाल तयार केला आहे. नरेंद्र मोदी हे सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते यामध्ये ठरले आहेत. मोदी यांना ६९ लाख जण फॉलो करतात. मोदीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा क्रमांक लागतो. त्यांना ६३ लाख फॉलोअर्स आहेत. तर पोप फ्रान्सिस हे तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांना ३७ लाख जण फॉलो करतात.

इन्स्टाग्रामवर आत्तापर्यंत मोदी यांनी फक्त ५३ फोटोच शेअर केले आहेत. पण तरीदेखील त्यांची लोकप्रियता सर्वाधिक असल्याचे दिसून येते. मोदी यांच्या एका पोस्टला सरासरी २ लाख २३ हजार प्रतिक्रिया आणि लाईक संस्थेच्या पाहणीनुसार येतात. गेल्या वर्षी मोदी हे तिसऱ्या स्थानी होते. पण यंदा त्यांनी थेट पहिले स्थान गाठले आहे. जगभरातील नेते सोशल मीडियावरुन संवाद साधत आहे. यातून त्यांची प्रतिमा तयार होत असून उद्योग जगताने यातून शिकले पाहिजे असे ब्रुसन मास्टेलर कंपनीचे सीईओ डॉन बायर यांनी सांगितले.

Leave a Comment