एअरटेलने लाँच केला इंटरनेट टीव्ही


नवी दिल्ली – हायब्रिड सेटअप बॉक्स एअरटेल कंपनीने दाखल केला असून एअरटेल इंटरनेट टीव्ही असे नाव त्याला देण्यात आले. यात अॅन्ड्रॉईड टीव्हीचाही वापर करण्यात आला आहे, असा हा पहिलाच सेटअप बॉक्स असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला. यात ऑनलाईन करमणूक सेवेबरोबरच गेम्स आणि अॅपचाही आनंद घेता येईल.

या सेटअप बॉक्सची किंमत कंपनीने ४९९९ रुपये ठेवली असून तीन महिन्यांसाठी डिजिटल टीव्हीचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. हा सेटअप बॉक्स सध्या अॅमेझॉनवर उपलब्ध असून लवकरच ऑफलाईन बाजारातही मिळणार आहे. या सेटअप बॉक्समध्ये नेटफ्लिक्स बरोबरच यूटय़ुब, गुगल प्ले आणि एअरटेल मुव्ही अॅप प्रीलोडेड मिळणार आहेत. कंपनीच्या दुस-या ऑफरनुसार, ७९९९ रुपयांत १ वर्षाचे डिजिटल टीव्ही सबस्क्रिप्शन मिळणार असून त्यामध्ये ५०० पेक्षा अधिक सॅटेलाईट टीव्हीचा आनंद घेता येईल. सुरुवातीची ऑफर संपल्यानंतर सर्व एसडी चॅनेल प्रतिमहिना ५०० रुपये, तसेच एसडी आणि एचडी चॅनेल्स प्रतिमहिना ७०० रुपयांना पाहता येतील.

Leave a Comment