भारत जगातले ३ रे मोठे कार मार्केट


भारतीय ऑटो उद्योगाच्या वाढीने नवे क्षितिज गाठले असून अमेरिका, जर्मनी व जपान यासारख्या बड्या मार्केटना पिछाढीवर टाकत भारत जगातील ३ नंबरचे कार मार्केट म्हणून पुढे आला आहे. तसेच सर्वाधिक वेगाने वाढणारी इंडस्ट्री अशीही भारताची ओळख निर्माण झाली आहे. इंटरनॅशनल ऑरगनायझेशन ऑफ मोटर व्हईकल मॅन्यूफॅक्चरर्सच्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे. या अहवालानुसार २०१६ मध्ये भारतातच प्रवासी वाहन प्रमाण ६.९९ टक्के वाढले आहे. या काळात अमेरिकेत हेच प्रमाण उणे ९.२४, जर्मनीत ४.५४ तर जपानमध्ये उणे १.४ असे आहे.

वास्तविक २०१५ मध्येच भारत टॉप पाच कार उद्योगात आला आहे. ऑटो एक्स्पर्ट पी. बालेंद्रन यांच्या मते भारतात विदेशी कंपन्यांची होत असलेली वाढ व अनेक विदेशी कंपन्या भारताचा निर्यात हब व उत्पादक हब म्हणून वापर करत असल्याने भारताला हे स्थान मिळविणे शक्य झाले आहे. त्याच अर्थव्यवस्थेची गतीही चांगली असल्याने ऑटो इंडस्ट्रीचा वेगाने विस्तार होत आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटो मॅन्यूफॅक्चररची आकडेवारी सांगते, ३१ मार्च २०१७ पर्यंतच्या आर्थिक वर्षात प्रवासी गाड्या विक्री ३० लाखंवर गेली आहे. गेल्या सहा वर्षातील ही सर्वाधिक वाढ आहे त्यातही एसयूव्हीची मागणी प्रचंड असून एसयव्हीच्या विक्रीतही ३० टक्के वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षातही विक्रीतील वाढ ६ ते ७ टक्के राहिल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment