शोलेतील रामगढ पुन्हा जिवंत होणार


बॉलीवूडच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेल्या व अनेक विक्रम नोंदविलेल्या रमेश सिप्पींच्या ब्लॉकबस्टर शोलेची क्रेझ अजूनही रसिकांच्या मनावरून उतरलेली नाही. याचा फायदा घेण्यासाठी कर्नाटक सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने बंगलोरपासून ७० किमी दूरवर असलेल्या मैसूर हायवेवरील रामनगरम या स्थानाला पुन्हा एकदा शोलेच्या रंगात रंगविण्याचा निर्णय घेतला आहे. सिप्पींच्या शोलेचे बरेचसे शूटिंग येथे झाले होते. त्याचप्रकारे पुन्हा एकदा येथे रामगढ गाव वसविले जाणार आहे.


गब्बरचा अड्डा, ठाकूरची हवेली, जयवीरूचे राहते घर, मंदिर, स्टेशन पुन्हा एकदा चित्रपटातील सीननुसार उभारले जाणार असून त्यामुळे पर्यटकांसाठी ते आकर्षण ठरणार आहे. यामुळे या ऐतिहासिक चित्रपटाच्या आठवणी ताज्या राहतीलच पण येथे भेट देणार्‍या पर्यटकांसाठी आणखीही एक आकर्षण असेल. ते म्हणजे चित्रपटातील कांही सीन थ्रीडी होलोग्राफिक तंत्रज्ञानाने सादर केले जाणार आहेत.


म्हणजे पर्यटक आपल्या अवतीभवती काही घटना घडत आहेत असा अनुभव घेऊ शकतील. मग त्यात गब्बर दिसेल, धन्नो घोडीसह जात असलेली बसंती दिसेल, माऊथ ऑर्गन वाजविणारा जय व त्याचवेळी दिवे मालविणारी ठाकूरची बहू दिसेल. या प्रकल्पासाठी साधारण साडेसात कोटी रूपये खर्च अपेक्षित असल्याचे पर्यटन प्रमूख प्रियंाक खडगे यांनी सांगितले. अर्थात ही उभारणी करताना पर्यवरणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे.

Leave a Comment