फाईव्ह जी सेवा देणारा पाकिस्तान पहिला द.आशियाई देश


पाकिस्तान लवकरच फाईव्ह जी सेल्यूलर सेवा परिक्षण करत असून त्यानंतर पाकिस्तान दक्षिण आशियातला ही सेवा देणारा पहिला देश बनेल. पाकिस्तानच्या मंत्री अनुशा रहमान यांच्या मते पाक सरकार जनतेला चांगली मोबाईल कनेक्टीव्हीटी देण्यासाठी कसून प्रयत्न करत आहे त्याचाच हा एक भाग आहे.

पाकिस्तानाला नुकतेच जीएसएमए पुरस्काराने गौरविले गेले आहे व मोबाईल अॅप ग्रुप यादीत पाकिस्तानला तिसरे रँकींग मिळाल्याचेही रहमान यांनी सांगितले. २०३० पर्यंत प्रत्येक गावात १०० मोबाईल युजर्ससाठी १ टॉवर उभा करण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून गेल्या दोन वर्षात ब्रॉडबँड चे प्रमाण ३ वरून २७ टक्के नागरिकांपर्यंत गेले आहे. डिजिटल पाकिस्तानसाठी सरकार प्रयत्नशील असून भाविष्यात ई कॉमर्स शिवाय मोबाईल अॅप सुरू करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे.

Leave a Comment