नवरी मिळेना अखेर बनविला रोबो आणि केले लग्न


लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे मानले जाते. आ संगणकाच्या युगात विवाहगाठी वधूवर स्वतःच मारतात असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. अर्थात लग्न तर करायचे आहे पण बायकोच मिळत नाही अशी अडचण आली तर? त्यावरही एका चीनी संगणक अभियंत्याने शक्कल लढविली आहे. त्याने स्वतःच फिमेल रोबो तयार करून तिच्यासोबत लग्न केले आहे. कदाचित यामुळे चीनमधील अनेक विवाहेच्छु मुलांना नवा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे चीनमध्ये वन चाईल्ड पॉलिसीचा दुष्परिणाम म्हणून लग्नाळू वयाच्या मुलींची संख्या खूपच रोडावली आहे व त्यामुळे अनेक उपवर तरूण लग्नाविना राहिले आहेत अथवा अन्य देशातून मुली आणून विवाह करत आहेत.

जेहेंग जिआजिआ हा असाच एक तरूण. व्यवसायाने संगणक अभियंता. त्यालाही लग्न करायचे होते मात्र मुलगीच मिळेना. अखेर आपण कुवॉरेच राहणार अशी भीती त्याला वाटली व त्याने चक्क त्याला हवी तशी, त्याच्या मनासारखी जीवनसाथी तयार केली. म्हणजे त्याने फिमेल रोबो बनविला. बायकोत असावेत असे सारे गुण व कौशल्ये त्याने या रोबोतच फिड केली व यिंगयिंग असे तिचे नांव ठेवून तिला पत्नी बनविले. यिंगयिंग सुंदर तर आहेच पण ती बोलते, बहुतेक सर्व चिनी रितीरिवाज तिला माहिती आहेत तसेच अनेक गोष्टी ही सहजी ओळखते. या लग्नाला वराचे जवळचे नातेवाईक व मित्र आवर्जून उपस्थित राहिले होते.

Leave a Comment