अखेर जिओने केला पुन्हा धमाका!


समर सरप्राइज बंद केल्यानंतर आता नवीन ‘धन धना धन’ ही ऑफर रिलांयस जिओने आणली असून या ऑफरची माहिती नुकतीच जिओने त्यांच्या अधिकृत वेबसाईट जाहीर केली आहे. याआधी आम्ही नवीन धमाकेदार प्लॅन्स-ऑफर्स आणणार आहोत, असे जिओकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार कंपनीने ही नवी ऑफर जाहीर केली आहे. आता कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा प्लॅन रिचार्ज करू शकता.

ग्राहकांना जिओच्या धन धना धन ऑफरमधून आणखी चांगले पर्याय कंपनीने आणले आहेत. या ऑफरनुसार ग्राहकांना १ जीबी ते २ जीबी डेटा मिळणार आहे. रोज १ जीबी डेटा प्लॅनसाठी तुम्हाला ३०९ रूपयांचे रिचार्ज करायचे आहे. या रिचार्जनंतर प्राईम मेंबरला ८४ दिवसांसाठी दररोज १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. म्हणजे ८४ दिवसांसाठी ८४ जीबी डेटा मिळणार आहे.

तेच जर तुम्ही जिओ वापरता पण प्राईम मेंबर नसाल तर तुम्हाला ही ऑफर ३४९ रूपयांमध्ये मिळेल. तर नवीन ग्राहकांना हीच ऑफर ४०८ रूपयांना मिळणार आहे.

तुम्हाला जर रोज २ जीबी डेटा हवा असेल तर तुमच्यासाठीही कंपनीने काही आणखी प्लॅन्स आणले आहेत. जर तुम्ही प्राईम मेंबर आहात आणि त्यानंतर तुम्ही कोणतही रिचार्ज केले नसेल तर तुमच्यासाठी ५०९ रूपयांचा नवा प्लॅन आहे. ज्यात तुम्हाला ८४ दिवसांसाठी २जीबी ४जी डेटा रोज मिळेल. जर तुम्ही प्राईम मेंबर नाही आहात तर तुम्ही ५४९ रूपयांचे रिचार्ज करू शकता. या प्लॅनची वैधता ही सुद्धा ८४ दिवसांसाठी आहे. सोबतच नवीन ग्राहकांसाठी हा प्लॅन ६०८ रूपयांसाठी आणला गेला आहे.

ट्रायने जिओची समर सरप्राईज ऑफर बंद केल्यानंतर जिओकडून नवीन धमाकेदार ऑफर आणली जाणार हे सर्वांनाच माहिती होतं. पण नेमकी कोणती ऑफर आणली जाणार याचा जराही अंदाज कुणाला नव्हता. पण आता जिओने सर्वच ग्राहकांसाठी ही धन धना धन ऑफर आणली आहे.

Leave a Comment