आता दररोज ठरणार पेट्रोल-डिझेलचे दर !


नवी दिल्ली: आता यापुढे दररोज पेट्रोल-डिझेलचेही दर ठरणार असून ५ शहरांत दररोज पेट्रोल-डिझेलचे दर पाहायला मिळतील. पाँडेचरी, विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), उदयपूर (राजस्थान), जमशेदपूर (झारखंड) आणि चंदीगढ यांचा पाच शहरांमध्ये समावेश आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज निश्चित व्हाव्या, अशी मागणी भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदूस्थान पेट्रोलियम या ऑईल कंपन्यानी केली आहे. या योजनेसाठी प्रायोगिक तत्वावर पाच शहरांची निवड करण्यात आली आहे. या शहरांत १ मे पासून ही योजना सुरु होईल.

वरील तीन आईल कंपन्यांचे पाँडेचरी, विशाखापट्टणम, उदयपूर, जमशेदपूर आणि चंदीगढ या पाच शहरात जवळपास २०० पेट्रोल-डिझेल पंप आहेत. या ठिकाणी इंधनाचे दर दररोज ठरतील आणि १ मेपासून दररोज नव्या दरानुसार इंधन मिळेल. दैनंदिन इंधन दराचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास, देशभरात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Leave a Comment