१४ एप्रिलला भारतात लाँच होणार अॅपलचे लाल रंगातील आयफोन


अॅपलच्या आयफोनचे डायहार्ड फॅन्स जगात असून ते तसे महाग असले तरी त्यांची क्वालिटी, कधीही हँग न होण्याची त्यांची क्षमता आणि त्याचबरोबर अॅपलची जबरदस्त ऑपरेटिंग सिस्टीम यामुळे या फोन्सची किंमत कितीही जास्त असली तरीही अॅपलची प्रोडक्ट्स बाजारात आली की त्यांच्यावर या फॅन्सच्या धडाधड उड्या पडतात. अॅपलचे ७ आणि ७ प्लस हे आयफोन्स आता लाल रंगात उपलब्ध होणार आहेत. हे फोन १४ एप्रिलला भारतात उपलब्ध होणार असल्याचे जाहीर झाले आहे.

आता या लाल रंगाच्या अॅपल फोनविषयीही अशीच क्रेझ निर्माण होते आहे. लाल फळाच्या नावाच्या अॅपल कंपनीला आपल्या आयफोनला लाल रंग द्यायला १० वर्ष लागली याचीही चर्चा रंगली आहे. या आयफोनमध्ये iOS १० व्हर्जन असणार आहे. या आयफोनचा लाल रंगही आकर्षक आहे. त्यात गुलाबी रंगांची छटा आहे. पण ही छटा असली तरी त्यामुळे लाल रंगाचा प्रभाव कमी होत नाही. त्यामुळे पुरूष आणि महिला अशा दोघांनाही या फोन वापरता येणार आहे.

आयफोनच्या नेहमीच्या रीतीप्रमाणे अॅपलचे हे फोन्ससुध्दा महाग असणार आहेत. भारतीय मार्केटमध्ये आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस यांची किंमत अनुक्रम ६०,००० ते ७२,००० रूपये असणार आहे.

Leave a Comment