टपाल खात्यात तब्बल १७८९ जागांसाठी भरती सुरु


मुंबई – तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर मग भारतीय पोस्ट खात्यातर्फे विविध पदांसाठी भरती करण्यात येत असून महाराष्ट्रात भारतीय पोस्ट खात्याने ‘ग्रामीण डाकसेवक’ या पदासाठी तब्बल १७८९ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली असून या पदासाठी उमेदवार हा केवळ दहावी पास असायला हवा. म्हणजेच महाराष्ट्रातील १०वी पास असलेल्या तरुणांसाठी नोकरी मिळविण्याती ही एक सुवर्णसंधीच आहे.

एकूण १७८९ पदांपैकी ओबीसी वर्गासाठी ३७५ जागा, एससी वर्गासाठी १२४ जागा आणि एसटी वर्गासाठी २५६ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. तर, खुल्या प्रवर्गासाठी १०३४ जागा आहेत. या पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारांनी कुठल्याही मान्यता प्राप्त बोर्डातून १० वी परीक्षा पास होणे गरजेचे आहे. उमेदवाराला संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. बेसिक ६० दिवस ट्रेनिंग प्रमाणपत्र आवश्यक राहील. यासाठी वयोमर्यादा १८ वर्षे ते ४० वर्षे पर्यंत ठेवण्यात आली आहे. इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण / ओबीसी प्रवर्गासाठी १०० रुपये फी तर एससी आणि एसटी महिला प्रवर्गासाठी विनाशुल्क आहे. अर्ज करण्याची तारीख ७ एप्रिल २०१७ पासून अंतिम तारीख ०६ मे, २०१७ असणार आहे. यासंबंधी अधिक माहीतीसाठी जाहिरात बघावी.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://www.appost.in/gdsonline/Home.aspx या लिंकवर क्लिक करावे. तर भरतीची संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी https://drive.google.com/file/d/0B21jo0OXJseVb2s5bG1QcXUyWGc/view या लिंकवर क्लिक करा.

Leave a Comment