गूगलची भारतीय चित्रकाराला ‘डूडल’च्या माध्यमातून मानवंदना


मुंबई – गूगलने डूडलद्वारे जगविख्यात भारतीय चित्रकार जामिनी रॉय यांना मानवंदना दिली असून गूगलने जामिनी रॉय यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त रॉय यांनी साकारलेल्या चित्राचे डूडल बनवून त्यांना आदरांजली वाहिली आहे.

विसाव्या शतकातील आधुनिक भारतीय चित्रकारांमधील जामिनी रॉय हे एक आहेत. केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगात आपला ठसा उमटवलेल्या मोजक्या भारतीय चित्रकारांमध्ये रॉय यांचे नाव आवर्जून घेतले जाते. जामिनी रॉय यांना चित्रकेलेतील त्यांच्या योगदानासाठी, १९५५ साली ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

पश्चिम बंगालच्या बोलियातोर या खेड्यात ११ एप्रिल १८८७ रोजी जन्मलेल्या जामिनी रॉय यांनी वयाच्या १६ व्या वर्षी चित्रकलेचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या चित्रांमध्ये ग्रामीण जिवनाचे प्रतिबिंब आवर्जून पाहायला मिळते. २४ एप्रिल १९७२ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

Leave a Comment