फ्लिपकार्टने मिळविली ९३०० कोटींची गुंतवणूक


देशातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमध्ये मायक्रोसॉफ्ट, ईबे व टेन्सेंट कंपन्यांनी ९३०० कोटींची गुंतवणूक केली आहे. स्नॅपडीलच्या खरेदीसाठी फ्लिपकार्ट प्रयत्नशील असतानाच ही गुंतवणूक झाल्याने कंपनीची व्हॅल्यू आता ११.६ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. फ्लिपकार्टच्या स्थापनेला १० वर्षे झाली आहेत व या काळातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. इतकेच नव्हे तर इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक मिळविणारी फ्लिपकार्ट भारतीय इंटरनेट कंपन्यांत सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.

कंपनीचे संस्थापक सचिन व बिन्नी बन्सल यांनी हे कंपनीचे लँडमार्क डील असल्याचे म्हटले आहे. हे फंडिग कॅश स्वरूपात अधिक आहे.मायक्रोसॉफ्ट ने फ्लिपकार्टच्या स्ट्रटिजिक व्हेचंरमध्ये गुंतवणूक केली आहे. सध्या टायगर ग्लोबल मॅनेजमेंट, नॅम्पर ग्रुप, एक्सेल पार्टर्नर्स, डीएसटी ग्लोबल यांचीही फ्लिपकार्टमध्ये या क्षेत्रात गुंतवणूक आहे. टेन्सेंटने सोशल मेसेजिंग अॅप व्ही चॅटमध्ये गुंतवणूक केली आहे तर ईबे फ्लिपकार्टचा हिस्साच आहे. फ्लिपकार्टकडे मित्रा, जबाँग, फोन पे, ई कार्ट या लोकप्रिय इंडियन ब्रँडचीही मालकी आहे.