सॅमसंगसह अॅपलला शाओमीची धोबीपछाड


मुंबई – भारतात चायनाचा शाओमी हा स्मार्टफोन लोकप्रिय ठरला असून एका सर्वेक्षणानुसार भारतातील २६ टक्के लोकांनी पहिली पसंती शाओमीला दिली आहे. हे सर्वेक्षण स्ट्रेटॅजिक अॅनालिटिक्स आयएनसीने केले असून या सर्वेक्षणानुसार शाओमीने सॅमसंगबरोबर अॅपल या मोबाईल कंपनीलाही मागे टाकले आहे.

या सर्व्हेनुसार, नवा स्मार्टफोन घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी शाओमीला पहिली पसंती दिली आहे. तब्बल २६ टक्के मते मिळवत शाओमी पहिल्या क्रमांकावर आहे. तर सॅमसंग आणि अॅपलला लोकांनी १२ टक्के मते दिली आहेत. तर लेनोव्हो आणि मोटोरोलाला ६ आणि ७ टक्के मते मिळाली आहेत.

Leave a Comment