सफरचंदांच्या बहरलेल्या बागा अनुभवायला चला हिमाचलला


हिमाचल प्रदेश हे निसर्गसौंदर्यसंपन्न राज्य येथील सफरचंदांसाठीही प्रसिद्ध आहे. जून जुलैपासून येथील झाडे सफरचंदांनी लगडलेली असतात व पाने मागे सारून हा बहर येत असतो. आपल्या कडे नारळ किवा आंबे, पेरूंची झाडे जशी घरोघरी दिसतात तसेच येथे सफरचंदांची झाडे असतात आणि सफरचंदांच्या झाडांना प्रथम बहर येतो तो फुलांचा. पांढ्र्‍या गुलाबीसर रंगांची ही फुले अति नाजूक आणि अतिसुंदर असतात. पर्यटनाबरोबरच हिमाचल सरकारचा सफरचंदातून मिळणारे उत्पन्न हा महसूलाचा मुख्य स्त्रोत आहे.

यामुळे येथील पर्यटन विभागाने सफरचंदांची झाडे फुलांवर येतात त्यावेळीही पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी योजना आखली असून सिमल्याजवळच्या कांही गावातून या बागांतून राहण्याची व तेथील सौंदर्य न्याहाळण्याची सुविधा देऊ केली आहे. सिमल्यापासून ५० ते ६० किमीच्या परिसरातील कंड्याली, मत्यापा अशा गावांतील बागांची निवड केली गेली आहे. पर्यटकांना होम स्टेची सुविधाही मिळू शकणार आहे यामुळे हिमाचलची संस्कृती व परंपरा समजून घेता येणार आहेत. १ हजार रूपये व ३५०० रूपये असे शुल्क आकारून ही सुविधा दिली जाणार आहे. त्यासाठी पर्यटन विभागाच्या वेबसाईटवरून ऑनलाईन बुकींग करता येणार आहे. सफरचंदाच्या झाडांना एप्रिल मे मध्ये फुलांचा बहर येतो.

Leave a Comment