वन प्लस फाईव्ह येतोय ८ जीबी रॅमसह


वन प्लस थ्रीटी स्मार्टफोन लॉचिंग पाठोपाठच कंपनीने त्याचे अपडेटेड व्हर्जन वन प्लस फाईव्ह नावाने बाजारात उतरविण्याची तयारी केली असून हा फोन ८ जीबी रॅमसह येईल असे समजते. या स्मार्टफोनला क्वालकॉम ऑक्टाकारे स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर व ग्राफिक्ससाठी अड्रेनो ५४० जीपीयू असेल असेही सांगितले जात आहे.

या स्मार्टफोनसाठी खास डिझाईन तयार केले गेले आहे. फ्रंट डिस्प्ले फुल एचडी ऐवजी क्वाड एचडी असेल आणि हा फोन ड्यूअल कॅमेर्‍यासह येईल. या वर्षाच्या दुसर्‍या सहामाहीत तो लाँच होईल असे संकेत दिले गेले आहेत. फोनची किंमत ५०० डॉलर्स म्हणजे साधारण ३२ हजार रूपयांपर्यंत असेल आणि त्याला १६ एमपीचा रियर व १६ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. त्यावर फोर के व्हिडीओ शूट करता येतील व हे व्हर्जन १२८ जीबी इंटरनल स्टोरेजसह असेल अशी माहिती टेक कंपनीच्या वेबसाईटवर दिली गेली आहे.