नासाकडून न्यूझीलंडच्या वानाका विमानतळावर अंतराळातील किरणांच्या शोध घेण्यासाठी सोडण्यात येणार्या सुपर प्रेशर बलूनचे उड्डाण पुढे ढकलले गेले आहे. नियोजित वेळेनुसार ८ एप्रिल, शनिवारी (न्यूझीलंडची वेळ) हा फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराचा सुपर प्रेशर बलून अंतराळात सोडला जाणार होता. मात्र पृथ्वीच्या खालच्या थरातील हवामान उड्डाणासाठी योग्य असले तरी वरच्या थरातील वारे व हवामान बिघडल्याने हा बलून सोडला गेला नाही.
सुपर प्रेशर बलूनचे उड्डाण लांबले
हा बलून अंतराळातून येणार्या किरणांचा शोध घेण्यासाठी सोडला जाणार असून तो पृथ्वीच्या मध्य अक्षांशावर दीर्घकाळ उड्डाण करणार आहे. उच्च उर्जेच्या अंतराळ किरणांचा वेध घेता यावा याच पद्धतीने त्याचे डिझाईन तयार केले गेले आहे. ही किरणे आपल्या आकाशगंगेबाहेरून येणारी व पृथ्वीचे वायूमंडल भेदणारी आहेत व त्यामुळेच त्यावर अधिक संशोधन व त्यांचा अभ्यास जरूरीचा असल्याचे नासातील वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.