दणकट बाईकस देणारया रॉयल एनफिल्डने बुलेट प्रेमींसाठी चांगली बातमी आणली आहे. जुनी बुलेट ५०० आता कंपनी बीएस फोर मानकांना अनुरूप होईल अशी अपग्रेड केली गेली असून ती मार्केटमध्ये दाखल झाली आहे. या बाईकची किंमत १ लाख ६२ हजार रूपये आहे.
बीएस फोर मानकांसह आली एनफिल्ड बुलेट ५००
सुप्रीम कोर्टाने १ एप्रिल २०१७ पासून बीएस थ्री मानक उत्सर्जन वाहनांच्या विक्रीवर बंदी लागू केली आहे. त्यामुळे आता सर्वच वाहन कंपन्या बीएस फोर मानकांसह त्यांची उत्पादने सादर करत आहेत. बुलेट ५०० त्याला अपवाद नाही. अर्थात या बाईकचे इंजिन तेच म्हणजे ४९९ सीसी पेट्रोल इंजिनच आहे मात्र त्याच्या पॉवर व टॉर्कमध्ये वाढ करण्यात आली आहे. गाडीचे वजन १ किलोने वाढवून १९४ किलो झाले आहे. या बाईकला सिगल सिलेंडर फोर स्ट्रोक इंजिनच कायम ठेवले गेले आहे तसेच बाहेरचा लूकही बदलला गेलेला नाही.