१०० रुपयांमध्ये १० जीबी डेटा देणार आयडिया


नवी दिल्ली – टेलिकॉम कंपन्यांमधील वॉर जिओच्या नवनव्या ऑफर्समुळे दिवसेंदिवस वाढत आहे. जिओला टक्कर देण्यासाठी आयडियाने नवा डेटा जॅकपॉट प्लॅन लाँच केला आहे. या डेटा जॅकपॉट प्लॅननुसार आयडियाच्या पोस्टपेड ग्राहकांना १०० रुपयांमध्ये १० जीबी डेटा मिळणार आहे.

ग्राहकांना १०० रुपयांत प्रतिमहिना १० जीबीच्या डेटाची आयडियाने ‘डेटा जॅकपॉट’ प्लॅननुसार ऑफर दिली आहे. या ऑफरनुसार तीन महिन्यांपर्यंत प्रतिमहिना १० जीबी डेटा मिळवता येणार आहे. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये बदल होणार असून, आतापर्यंत १ जीबीसाठी मोजावे लागणा-या पैशात तुम्हाला १० जीबी डेटा मिळणार आहे. मात्र या ऑफरनुसार तीन महिन्यांनंतर तुम्हाला १०० रुपयांच्या रिचार्जवर प्रतिमहिना १ जीबीचा डेटा मिळणार आहे. मात्र कंपनीने आम्ही वेळोवेळी आमच्या ऑफरमध्ये बदल करणार असल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment