अखेर विकला गेला माल्ल्याचा ‘किंगफिशर व्हिला’


मुंबई – भारतीय बँकांचे कर्ज बुडवणाऱ्या विजय माल्ल्याचा आलिशान व्हिला अखेरीस विकला गेला आहे. त्याने ज्या बँकांकडून कर्ज घेतले होते त्यांनी ‘किंगफिशर व्हिला’ तब्बल ७३.०१ कोटी रुपयांना विकले आहे. हा व्हिला एखाद्या प्रायव्हेट डीलप्रमाणे एका मुव्ही प्रॉडक्शन कंपनी विकिंग मीडिया आणि एंटरटेनमेंटने खरेदी केला आहे. हा व्हिला अभिनेता आणि प्रॉड्युसर सचिन जोशीने खरेदी केला आहे.

विजय माल्ल्याला बँकांनी दिलेल्या कर्जापैकी काही भाग वसूल करण्यासाठी हा व्हिला विकला आहे. माल्ल्याने किंगफिशर एअरलाइंससाठी कर्ज घेण्याकरता आपल्या ज्या ज्या गोष्टींचा आधार घेतला होता. त्यातील एक गोष्ट म्हणजे गोव्यातील हे किंगफिशर व्हिला.

याबाबत बोलण्यास एसबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. माल्ल्याला कर्ज देणाऱ्या १७ बँकांचे ९ हजार करोड रुपये वसूल करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचमुळे आता मुंबईतील किंगफिशर हाऊस विकण्याचा देखील प्रयत्न सुरू आहे.

समुद्र किनाऱ्यावर बसलेल्या या किंगफिशर व्हिलामध्ये माल्ल्याच्या अतिशय महागड्या आणि मोठ्या पार्ट्या होत होत्या. गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी हा खूप चर्चेचा विषय असे. अनेक लोक हा व्हिला पाहण्यासाठी जात होते. ऑक्टोबर २०१६ ला पहिल्यांदा याला विकण्याचा प्रयत्न केला गेला. तेव्हा त्याची किंमत ८५.२९ करोड ठेवण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये ती रिझर्व किंमत काढून ८१ करोड रुपये ठेवली होती. मात्र तेव्हा देखील या व्हिलाला विकण्यात अनेक अडचणी आल्या. आणि मग आता मार्च २०१७ मध्ये त्याची किंमत ७३ करोड रुपये ठेवली आणि हा प्रयत्न यशस्वी झाला.

‘जेएमजे ग्रुप ऑफ कंपनीज्’चे उपाध्यक्ष ३२ वर्षीय सचिन जोशी हे असल्याचे त्यांच्या वेबसाईटवर लिहिले आहे. अझान, मुंबई मिरर, जॅकपॉट यासारख्या चित्रपटांमध्ये ते झळकले होते. लिलावात ठरलेल्या मूळ किमतीपेक्षा जास्त किंमत या व्हिलासाठी मोजावी लागेल्यामुळे जोशींना ७३ कोटींपेक्षा जास्त किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे.

गोव्याच्या कंडोलिम भागात असलेला हा किंगफिशर व्हिला अनेक नियमांनी विकला गेला. या प्रकरणात विकिंग मीडियाचे मालक सचिन जोशी हे शेवटी रिझर्व प्राइजपेक्षा १ लाख अधिक रुपये देऊन खरेदी करण्यास तयार झाले. सचिन जोशी हे देखील गोव्याच्या बिअर ब्रँड किंग्स बियरचे मालक आहेत. त्याचप्रमाणे लोकप्रिय प्लेबॉय एंटरप्राइजेसचे भारतात असलेल्या पीबी लाइफस्टाइलचा तो एक छोटा हिस्सा आहे.

Leave a Comment