टाटा थांबवणार नॅनो, इंडिका, सुमो कारची निर्मिती


कोलकाता: नव्या कार्स बाजारात आणण्यासाठी देशातील प्रसिद्ध कार कंपनी टाटाने काही जुन्या कार्सचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नॅनो, इंडिका, इंडिगो सीएस आणि सूमो या चार गाड्यांचा यात समावेश असल्यामुळे यापुढे तुम्हाला या कार घेता येणार नाही. या कार्स आता इतिहास जमा होणार आहेत. या गाड्यांचे उत्पादन २०२१ पर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. यापूर्वी टाटाने व्हेरियंट सूमो ग्रँडचे उत्पादन बंद केले होते.

टाटा मोटर्सचे मार्केटिंग विभागाचे प्रमुख विवेक श्रीवास्तव यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल विकसित करायचे आहे. सध्या आमच्या पोर्टफोलियोमध्ये १० कार आहेत. त्यात नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या कॉम्पॅक्ट सिडेन टिगोर या गाडीचाही समावेश आहे. २०१९ ते २०२० पर्यंत आम्ही कमीत कमी नवीन चार कार लॉन्च करणार आहोत आणि एक-एक करून आमच्या जुन्या कारच उत्पादन बंद करणार आहोत, अशी माहिती दिली.

नॅनो कार टाटा कंपनीने बाजारात आणल्यानंतर या कारला मोठी मागणी आली होती. मात्र त्यानंतर या कारच्या खरेदीवर मोठा परिणाम झाला. नॅनोमुळे कंपनीला नुकसान होत असल्याने नॅनोचे उत्पादन बंद करायला हवे, असे सायरस मिस्त्री सांगत होते. त्यामुळे टाटा ग्रुपमध्ये मतभेद झाले होते. मात्र आता मिस्त्री यांचे म्हणणे आता टाटा ग्रुपला पटले असून त्यांनी नॅनोचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment