इतर कंपन्याही केवळ ३६ रूपये भरून देणार जिओसारखी सेवा


मुंबई: रिलायन्सला जिओ समर सरप्राईज प्लॅन मागे घेण्याचे आदेश ट्रायने दिले असून त्यामुळे जिओची ही सेवा आता नव्या ग्राहकांना घेता येणार नाही. जिओच्या समर सरप्राईज ऑफर अंतर्गत ४जी इंटरनेट डेटा तीन महिन्यांसाठी फ्रि देण्यात येणार होता. जिओ प्राईमनेही त्याआधी ग्राहकांना चांगलीच भुरळ घातली होती. पण जे ग्राहक आता जिओची ही सेवा घेऊ शकणार नाहीत त्यांनी नाराज होण्याचे कारण नाही कारण अशीच सेवा इतरही कंपन्या देत आहेत. पण त्यासाठी केवळ ३६ रूपये तुम्हाला जास्त द्यावे लागणार आहेत. ही सेवा एअरटेलनेही सुरू केली आहे.

टेलिकॉम विश्वातील इतर कंपन्या रिलायन्स जिओच्या अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, २८जीबी-४जी डेटा आणि २८ दिवसांची व्हॅलिडीटीने चांगल्याच गोंधळल्या होत्या. त्यामुळे जिओला टक्कर देण्यासाठी इतर कंपन्या तसेच २० ते ३० रूपयांच्या फरकाचे नवे प्लॅन्स आणत आहेत. आयडिया, एअरटेल आणि वोडाफोन यांनी अनेक नवे प्लॅन्स आणले आहेत. कारण या कंपन्यांना जिओमुळे मोठा फटका बसत आहे. आपले ग्राहक टिकवण्यासाठी त्यांनीही कंबर कसली आहे. त्यामुळे जिओची सेवा तुम्ही घेऊ शकत नसाल तरी तुमच्या पर्याय अनेक आहेत.

कंपनी किंमत (Prepaid) कॉल्स कॉल्स डेटा प्लान्स कालावधी
रिलायन्स जिओ Rs 303 अनलिमिटेड व्हॉईस कॉल 28GB- 4G data 28 days
एअरटेल Rs 349 अनलिमिटेड व्हॉईस कॉल 28GB- 4G data 28 days
वोडाफोन Rs 349 अनलिमिटेड व्हॉईस कॉल 28GB- 4G data 28 days
आयडिया Rs 348 अनलिमिटेड व्हॉईस कॉल 2G unlimited data 1 month

देशातील करोडो लोकांनी रिलायन्सच्या जिओची सेवा घेतल्यामुळे आता रिलायंस ट्रायच्या आदेशाचे पालन करत येत्या काही दिवसात ३ महिन्यांचा प्लॅन परत घेण्याचा निर्णय घेऊ शकते. रिलायंस जिओची पहिली ऑफर सप्टेंबर २०१६ ते डिसेंबर २०१६ आणि त्यानंतर दुसरी ऑफर जानेवारी ते मार्च अशी होती. त्यानंतर जिओची प्राईम सेवा घेण्याची मुदत १ एप्रिलपर्यंतच होती. मात्र ती पुढे १५ दिवस वाढवण्यात आली. ही सेवा घेण्याची मुदत नंतर १५ एप्रिलपर्यंत ठेवण्यात आली. तेव्हा हेही सांगण्यात आले की, ज्यांनी जिओची प्राईम सेवा घेऊन ३०३ रूपयांचा रिचार्ज केला आहे त्यांना पुढच्या तीन महिन्यांचीही सेवा मोफत मिळणार. आणि त्यानंतर जुलै महिन्यापासून सेवेसाठी पैसे मोजावे लागणार. पण आता ट्रायने जिओला दणका दिल्याने ही सेवा मागे घ्यावी लागणार आहे.

Leave a Comment