अवघ्या ५९९ रुपयात सौर उर्जेवर चार्ज होणारी पॉवर बँक


मुंबई: सौर उर्जेवर चार्ज होणारी छोटी पॉवर बँक यूआयएमआय टेक्नोलॉजीने लाँच केली आहे. वॉटरप्रूफ, डस्टप्रूफ ही पॉवर बँक असणार आहे. तसेच यासारखे अनेक फीचर यामध्ये आहेत. ही पॉवर बँकमध्ये सौरउर्जा आणि वीज या दोन्हीवर चार्ज करता येणार आहे. याची किंमत फक्त ५९९ रु. आहे.
यु३ सोलर पॉवर बँकनंतर यूआयएमआयने याचे छोटे व्हेरिएंट यूआयएमआय यु३ मिनी पॉवर बँक लाँच केली. सोलर एनर्जीसोबत यामध्ये टॉर्च पॅनलही देण्यात आले आहे. १५० ग्राम वजनाची ही पॉवरबॅक फारच हलकी असून ती कुठेही नेणे सहज शक्य आहे. याचा आकार देखील पातळ असून फारच आकर्षक आहे.

याबाबत माहिती देताना यूआयएमआय टेक्नोलॉजिचे मार्केटिंग मॅनेजर अभिनय प्रताप सिंह यांनी सांगितले की, यूआयएमआय यु३ मिनी रबर आणि प्लास्टिक फिनिश मटेरिअलने बनविण्यात आली आहे. ज्यामुळे हे वॉटरप्रूफ आहे. ४००० mAh क्षमतेची ही पॉवर बँक ओवरहीटिंगशिवाय कोणताही फोन १ ते २ वेळा चार्ज करु शकता. यामध्ये बॅटरी इंडिकेटर लाइट्स देखील आहेत. जे शिल्लक सौर उर्जा आणि चार्जिंग असल्याचे दाखवत.

Leave a Comment