ट्विटरने लॉंच केले ‘ट्विटर लाईट’


नवी दिल्ली: जगभरातील युजर्ससाठी एक नवी सेवा लोकप्रिय असलेल्या ट्विटर या माइक्रो ब्लॉगिंग साईटने आणली असून स्मार्टफोन आणि टॅब्लेट युजर्ससाठी ही नवी सेवा आणली गेली असून यामुळे युजर्सचा ७० टक्के डेटा वाचवता येणार आहे. ‘ट्विटर लाईट’ ही सेवा ट्विटरने युजर्ससाठी आणली आहे आणि यामुळे ३० टक्के अधिक वेगाने कंटेंट अपलोड करता येणार आहे. ही सेवा ट्विटरने गुगलच्या मदतीने डेव्हलप केली आहे.

भारतात ट्विटरने सर्वप्रथम ही सेवा सुरू केली असून त्यानंतर इंडोनेशिया आणि फिलिपाइन्समध्ये लवकरच ही सेवा सुरू केली जाणार आहे. हिंदी, मराठी, बंगाली, कन्नड, तमिळ, गुजराती या सहा भारतीय भाषांसह ४२ भाषांमध्ये ट्विटर लाइट उपलब्ध असणार आहे. ट्विटर लाईट ही सेवा वेब ब्राऊजरच्या माध्यमातून वापरता येणार आहे. पण ट्विटरच्या अ‍ॅपच्या फिचर्ससारखेच सगळे फिचर्स यात वापरता येणार आहेत.

भारतीय बाजारपेठ आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे ट्विटरच्या व्यवस्थापकीय संचालिका माया हरी यांनी नमूद केले. ट्विटरची सेवा सर्वांना मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असून ट्विटर लाइट हे त्यादिशेने टाकलेले महत्त्वाकांक्षी पाऊल आहे, असे त्या म्हणाल्या.

ट्विटर लाइट हे प्रोग्रेसिव्ह वेब अॅप गुगलच्या सहकार्याने बनवण्यात आले आहे. डायरेक्ट मेसेज, सर्च बटन, फिड यासह अँड्रॉइड मोबाइलवर नोटिफिकेशन पाठवण्यासाठी खास फिचर देण्यात आले आहे. मोबाइल आणि डेस्कस्टॉपवरही हे अॅप वापरता येईल. यासाठी तुम्हाला mobile.twitter.com या साइटवर लॉग इन करावे लागेल. हे अॅप क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. ‘क्रिकबझ’ या कंटेंट पार्टनरच्या माध्यमातून टी-२० सामन्यांचे ताजे अपडेट्स, सामन्यांदरम्यानच्या महत्त्वाच्या घडामोडी युजर्सना कळणार आहेत.

Leave a Comment