दररोज बदलू शकतात पेट्रोल, डिझलचे भाव !


नवी दिल्ली – आता प्रत्येक दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांकडून बदल केले जाऊ शकतात. सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या कंपन्यांकडून जागतिक घडामोडी आणि त्याचे खनिज तेलाच्या दरावर होणारे परिणाम याचा अभ्यास करुन इंधनाचे दर दररोज बदलता येण्याबद्दल विचार सुरु आहे. असे घडल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दररोज बदल होऊ शकतो. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या कंपन्यांचे देशभरातील ९० टक्के इंधन बाजारावर नियंत्रण असल्यामुळे याचे मोठे आणि दूरगामी परिणाम होऊ शकतात. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलल्यास त्याचा परिणाम कोट्यवधी लोकांवर होणार आहे.

पेट्रोलियम कंपन्यांकडून सध्या दर पंधरा दिवसांनी इंधनाच्या दरांमध्ये बदल केले जातात. इंधनाचे दर आणि जागतिक स्तरावरील घडामोडी विचारात घेऊन दर पंधरा दिवसांनी पेट्रोलियम कंपन्यांकडून जागतिक बाजारपेठेतील दरांमध्ये बदल केले जातात. मात्र दर पंधरा दिवसानंतर घेण्यात येणारा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलांच्या किमतींचा आढावा आता दररोज घेतला जाण्याची शक्यता आहे. सध्या हे धोरण पेट्रोलियम कंपन्यांकडून विचाराधीन आहे. हे धोरण लागू करण्यात आल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दर पंधरा दिवसांनी न बदलता प्रत्येक दिवशी बदलतील.

Leave a Comment