सरप्राईज बनून राहिली जिओची समर सरप्राईज ऑफर


नवी दिल्ली – टेलिकॉम सेक्टरमध्ये गेल्याकाही दिवसांपासून धुमाकूळ घालणा-या रिलायन्स जिओला ट्रायने एक जोरदार धक्का दिला असून रिलायन्स जिओला दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्रायने दिलेल्या धक्क्याचा परिणाम रिलायन्स जिओच्या ग्राहकांना बसणार आहे.

ट्रायने प्राइम मेंबरशिप घेण्यासाठी जिओने दिलेली १५ दिवसांची वाढीव मुदत मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच समर सरप्राइज ऑफरदेखील मागे घेण्यास सांगितले आहे. ट्रायने दिलेल्या या आदेशानंतर रिलायन्स जिओकडून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, ज्या ग्राहकांनी आधीच या ऑफरसाठी नोंदणी केली आहे त्यांना याचा फटका बसणार नाही.

आपल्या ग्राहकांना रिलायन्स जिओने वेलकम ऑफरच्या माध्यमातून ३१ मार्च २०१७ पर्यंत मोफत डेटा आणि कॉलिंगची सेवा पुरवली. ३१ तारखेनंतर जिओच्या ग्राहकांना या सेवांसाठी पैसे मोजावे लागणार होते. मात्र, जिओने समर सरप्राईज ऑफर लॉन्च करत पुन्हा ग्राहकांना ३ महिन्यांसाठी मोफत डेटा आणि कॉलिंगची सेवा देण्यात येईल असे जाहीर केले होते.

हॅप्पी न्यू इयर ऑफर संपेपर्यंत अपेक्षेएवढ्या ग्राहकांनी प्राइम मेंबरशिपसाठी नोंदणी न केल्याने जिओने प्राइम मेंबरशिपसाठी १५ दिवसांची मुदत वाढवली होती. तीन महिने मोफत डेटा मिळवण्यासाठी ग्राहकांना १५ एप्रिलपूर्वी प्राईम मेंबरशिप घेणे गरजेचे करण्यात आले होते. मात्र, आता ट्रायने दिलेल्या आदेशामुळे ज्या ग्राहकांनी प्राईम मेंबरशिप घेतली नाही त्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Comment