नवी दिल्ली : लवकरच ४जी सपोर्टिव्ह लॅपटॉप रिलायन्स जिओ लॉन्च करु शकते. ४जी सिमसाठी खास या लॅपटॉपमध्ये जागा असेल. याबाबतचे वृत्त फोन रडारने दिले असून त्यांच्या वृत्तानुसार, सध्या लॅपटॉप लॉन्च करण्याच्या तयारीत जिओ आहे. जिओच्या लॅपटॉपचे डिझाईन अॅपलच्या मॅकबुकसारखे असेल.
आता लॅपटॉप क्षेत्रातही उतरणार रिलायन्स जिओ?
जिओ लॅपटॉपचा स्क्रीन १३.३ इंचाचा संपूर्ण एचडी असेल. एचडी व्हिडीओ कॉलिंग कॅमेऱ्यासोबतच, चिकलेट कीबोर्ड आणि मॅग्निशयम एलॉय बॉडी दिली जाईल. लॅपटॉप थंड राहावा, यासाठी लॅपटॉपमध्ये कूलिंग फॅनही लावला जाईल. क्वार्ड कोअर इंटेल प्रिमियम प्रोसेसर आणि ४ जीबी रॅमसोबतच कनेक्टिव्हिटीमध्ये चांगले फीचर्स पाहायला मिळणार आहेत. 4g, LTE, ब्लूटूथ, यूएसबी पोर्टही दिले जाईल.
रिलायन्स जिओने लॅपटॉपसंदर्भात तैवानमधील कंपनी फॅक्सकॉनशी चर्चाही सुरु केली असल्याचा दावा फोन रडारने केला आहे. टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने आधीच प्रस्थापित कंपन्यांना दणका दिल्यामुळे आगामी काळात जिओ लॅपटॉप आल्यास सध्याच्या लॅपटॉप कंपन्यांना नक्कीच मोठी स्पर्धा निर्माण होईल.